Services Provided Are :

श्री.विश्वचरक आयुर्वेद विध्दकर्म, अग्निकर्म, पंचकर्म व क्षार सूत्र चिकित्सालय

Dr. Ravinder Singh Shekhawat

BAMS, MD(AM), DNHE, PGDIP ,MSc YOGA

Ayurvedic Expert

ॐ 卐 श्री .विश्व चरक आयुर्वेद पंचकर्म और क्षार सूत्र चिकित्सालय

आयुर्वेद अग्निकर्म व विध्दकर्म और क्षार सूत्र, पंचकर्म चिकित्सा

+91 8386895928

I, Dr. Ravindar Ayurveda, would like to briefly express how wonderful Ayurveda is.

मी M.B.B.S. ला प्रवेश मिळाला नाही म्हणून B.A.M.S. ला आलेला एक विद्यार्थी. प्रथम वर्षाला असताना B.A.M.S. चा अभ्यासक्रम, संस्कृत श्लोक, हे सर्व पाहुन, वाचताना, अभ्यास करत असताना अत्यंत क्लेश निर्माण झाला. आपण BAMS ला येऊन काही चुक तर केली नाही ना? असा प्रश्न नेहमी असायचा. प्रथम वर्षाचे पहिले ८ महिने तर याच विचारात गेले. तद्नंतर प्रथम वर्षाची परीक्षा जवळ आली तेव्हा माझाच वर्गमित्र ज्ञानेश्वर याच्या मार्फत डॉ. योगेश सरांशी ओळख झाली. तेव्हा, त्यांचे नुकतेच अंतिम वर्ष संपले होते. मी, गणेश, ज्ञानेश्वर, रामदास, विष्णू असा 5-6 जणांचा एक ग्रुप होता. योगेश सर म्हणजे आमच्या बाकीच्या सिनीयर्स पेक्षा एक वेगळं व्यक्तीमत्व. त्यांच्या आपुलकीच्या, प्रेमाच्या बोलण्यामुळे त्यांच्याशी जवळीकता वाढत गेली व योगेश सरांचे योगेश भैय्या कधी झाले कळलेच नाही. प्रथम वर्षाच्या शेवटच्या 3 महिन्यामध्ये त्यांनी आमचे अष्टांग ह्रदयचे पाठ सुरु केले. त्यांची समजावुन सांगण्याची पद्धत, शास्त्रपठण, शास्त्रवाचन हे पाहुन आयुर्वेदाकडे कसे पाहावे ही दृष्टीच जणु मिळत गेली. त्यामुळे प्रथम वर्ष कसे गेले हे समजलच नाही. पुढे भैय्या कडून डॉ. चंद्रकुमार देशमुख सरांची ओळख झाली.

डॉ. देशमुख सर म्हणजे माझ्यासारख्या BAMS ला आलेल्या एका नव्या विद्यार्थ्यांसाठी एक चैतन्य.
आयुर्वेदिक डॉक्टरांकडे एवढे पेंशट,गर्दी असते, हे पहिल्यांदाच सरांच्या क्लिनिक ला पाहिले. अग्निकर्म,विद्धकर्मामुळे रुग्णांना लवकर बरे वाटत होते,त्वरित उपशय मिळतो. हे पाहून आयुर्वेदिक प्रॅक्टीस करण्याचा विश्वास वाढत गेला. यामध्ये मदत झाली ती भैय्यांची. भैय्यांमुळे अग्निकर्म विद्धकर्माचा पाया पक्का होत गेला. पुढे आपणही आयुर्वेदिक प्रॅक्टिस करायची हे पक्क झाल होत.

पण आपण स्वतः एकट्याने, कोणाची काही मदत नसताना आयुर्वेदिक चिकित्सा करणे, याची मनात भीती होती. हे सर्व आपल्या कडून होईल का? असा प्रश्न होता. याबाबत भैय्यासोबत बोलताना भैय्यांनी श्री वारकरी आयुर्वेद हा विचार आमच्यासमोर सांगितला.

एकट्याने स्वतः काही करण्यापेक्षा चार-चौघाची ताकद एकत्र करून श्री वारकरी आयुर्वेद या छत्राखाली येऊन काम करण्याने आपल्यासोबतच आपल्याकडील लोकांपर्यंत आयुर्वेद पोहचवणे हे सोईचे होणार होते. याच संकल्पनेसोबत आम्ही सर्वांनी काम सुरू केले. भैय्यांच्या याच विचाराला आम्ही प्रमाण मानून आजपर्यंत एकत्र काम करत आहोत. लातुर येथे श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालया अंतर्गत मी उत्कृष्टरित्या अग्निकर्म व विद्धकर्माच्या मदतीने अनेक रुग्णांनवर उपचार करत आहे.

सध्या श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालय हे उदगीर, लातुर, जालना या ठिकाणी सुरू आहे व हे असेच वृद्धिंगत होईल हा विश्वास आहे. याचबरोबर माझ्यासारख्या नवीन वैद्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे, अग्निकर्म विद्धकर्म सर्वापर्यंत पोहचावे यासाठी श्री वारकरी आयुर्वेद हे भैय्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहे. श्री वारकरी आयुर्वेदातील सर्वांचा एकमेकांवरील विश्वास व प्रेम आणि आयुर्वेद पुढे नेत काम करतानाचा आनंद हे सर्व श्रीगुरु कृपेने प्राप्त झाले, हे माझे आहोभाग्य व असा कृपापात्र भाग्यशाली हाच माझा परिचय…